Sharad Pawar Resigns | ‘या’ आमदारानं शरद पवार यांना केली हात जोडून विनंती अन् म्हणाले…
VIDEO | म्हणून तरी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, हात जोडून 'या' आमदारानं केली विनंती
नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांमध्येच अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र शरद पवार हे केवळ राष्ट्रवादी पुरतेच मर्यादित नसून सर्वपक्षीय नेत्यांच्या आदरस्थानी आहेत. अशातच राष्ट्रवादी सोबत काँग्रेसचे देखील आमदार शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत आहेत. नाशिकच्या इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी तर आपण पवारांमुळेच काँग्रेसचे आमदार झालो असं सांगत शरद पवार यांना हात जोडून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. यावेळी बोलताना हिरामण खोसकर म्हणाले, ‘2014 ला मला तिकीट दिल पण मी पराभूत झालो. मी काँग्रेसमध्ये साहेबांच्या सांगण्यावरून गेलो. इतकेच नाही तर शरद पवार साध्या कार्यकर्त्याला जीव लावणारा देशाचा नेता आहे. त्यांनी तर माझ्यासाठी नेत्यांची फौज लावली होती. मविआ च्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा’, असे म्हणत त्यांनी शरद पवारांना कळकळीची विनंती केल्याचे पाहायला मिळाले.