ललित पाटील प्रकरणात आणखी एका मंत्र्यांचं नाव…, रवींद्र धंगेकर यांचा मोठा दावा काय?

| Updated on: Oct 27, 2023 | 5:28 PM

VIDEO | ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवं नवे खुलासे होत असताना ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात आणखी एका मंत्र्यांचं नाव पुढे येणार असल्याचा मोठा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील याला सातत्याने एक मंत्री फोन करत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुणे, २७ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात आणखी एका मंत्र्यांचं नाव पुढे येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील याला सातत्याने एक मंत्री फोन करत होता, असेही त्यांनी म्हटले आहे. तर गेल्या ९ महिन्यांपासून ललित पाटील हा ससूनमध्ये उपचार घेत होता. ललित पाटील याच्यावर ससूनचे डिन डॉ एस.एस टी म्हणजेच डॉ संजीव शामराव ठाकूर हे उपचार करत होते, असे म्हणत डॉ संजीव ठाकूर आणि ललित पाटील यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तर आता संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून अटक करण्यात यावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार ललित पाटीलला हर्निया आजार झाला होता आणि त्याच्यावर डॉ संजीव शामराव ठाकूर यांनी उपचार केले होते. त्यामुळे आता  डॉ ठाकूर यांच्या अडचणी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Oct 27, 2023 05:28 PM
वसई विरारकरांच्या प्रश्नासाठी मनसे रस्त्यावर, काय केली मागणी?
Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनी ललित पाटीलच्या मृत्यूची व्यक्त केली भिती, म्हणाल्या एन्काऊंटर होणार?