‘२०१९ ला मंत्रीपद मिळेल अशी आशा होती पण…’, संग्राम थोपटे यांनी काय व्यक्त केली खंत?

| Updated on: Aug 21, 2023 | 8:26 PM

VIDEO | 'विरोधी पक्ष नेता होण्याची इच्छा असूनही त्यांना डावललं जात आहे, तर काँग्रेस आमदार फुटणार हा जावई शोध कुठून लागला? मला माहिती नाही, पण कुणाच्या अंर्तगत नाराजीमुळं आमदार फुटतील अशी आत्ता तरी काँग्रेसमध्ये परिस्थिती नाही'

पुणे, २१ ऑगस्ट २०२३ | शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी, विजय वड्डटीवार यांना विरोधी पक्ष नेता केल्यावर नाराजीमुळं काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असल्याचा दावा केलाय. त्यावर काँग्रेसचा कुठलाही आमदार फुटणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी दिलीय. मात्र त्यांनतर विरोधी पक्ष नेता होण्याची इच्छा असूनही त्यांना डावललं जात असल्याच म्हणतं खंत व्यक्त केलीय. काँग्रेस पक्ष नाही तर पुण्यातील राजकीय शक्तींमुळं त्यांना डावललं जात असल्याचं त्यांनी म्हंटलंय.पुणे जिल्ह्यातल्या परकीय शक्तींच्यामुळे मला डावललं जात असल्याचं म्हणतं त्यांनी अप्रत्यक्षपणे पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. पुणे जिल्हा म्हणलं डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप थोपटे यांनी केलाय. तर काँग्रेस आमदार फुटणार हा जावई शोध कुठून लागला? मला माहिती नाही, पण कुणाच्या अंर्तगत नाराजीमुळं आमदार फुटतील अशी आत्ता तरी काँग्रेसमध्ये परिस्थिती नाही, असेही ते स्पष्टपणे म्हटले.

Published on: Aug 21, 2023 08:25 PM
‘काहीजण डोळे वटारल्यावर पळाले’, उद्धव ठाकरे यांनी कुणावर केली अप्रत्यक्ष टीका
‘नाहीतर शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याची परवानगी द्या’, सदाभाऊ खोत यांचा सरकारला थेट इशारा