विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळे मंत्री झाले, कुणी केला मोठा दावा?

| Updated on: May 01, 2023 | 1:38 PM

VIDEO | चंद्रपूर जिल्ह्यात बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असताना विजय वडेट्टीवार यांना कुणी दिलं लोकसभा लढवण्याचं चॅलेंज?

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला बाहेर, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदाराने जर आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी विधानसभा पाहून टाकतो, असे म्हणत बाळू धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना आव्हान दिले आहे. चंद्रपुरात काँग्रेसची जबाबदारी असलेल्या धानोरकर यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यावरून माजी मंत्री वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्यावर समर्थकांमार्फत टीका केली, त्यावर खासदार बाळू धानोरकर यांनी उत्तर दिले आहे. सोबतच त्यांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्या मुळे विरोधी पक्षनेते आणि मंत्री झाल्याचा दावा केला. मात्र वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच कार्यकर्त्यांचं काम केलं नाही, आमदाराला निधी दिला नाही, कार्यकर्ते मजबूत केले नाही असा आरोप धानोरकर यांनी केल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: May 01, 2023 01:38 PM
त्यांना शरिया कायदा हवा; म्हणूनच संविधानानं बोंब मारत आहेत; भाजप नेत्याची राऊत यांच्यावर सडकून टीका
महाराष्ट्र दिनानिमित्त ‘लालपरी’च्या ताफ्यातील नवी कोरी इलेक्ट्रिक बस प्रवाशांच्या सेवेत