मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
VIDEO | असंच कुणालाही मुख्यमंत्री होता येत नाही, अजित पवार यांचा रोख नेमका कुणावर?
मुंबई : मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. भाषणात बोलून मुख्यमंत्री होत नाही तर त्यासाठी १४५ चा आकडा लागतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा लागतो. आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं. जिथं उद्धव ठाकरे गटाची ताकद असेल, जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल त्यांना तिथे उमेदवारीचं तिकीट देऊ तर जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असेल तिथे त्यांना तिकीट देऊ, असे अजित पवार म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी हे भाष्य केले आहे. नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले म्हणून कुणालाही त्रास होण्याचं कारण नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत असल्यामुळे त्यांनी पोस्टर लावले असतील. परंतु असंच कुणालाही मुख्यमंत्री होता येत नाही.