संजय राऊत यांनी विचार करून बोलावं, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्लावजा इशारा

| Updated on: May 04, 2023 | 9:00 AM

VIDEO | गांधी परिवारावर बोलणं म्हणजे..., काँग्रेसच्या बड्या नेत्याचा संजय राऊत यांच्यावर पलटवार, काय दिला सल्ला?

भंडारा : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, आम्ही काँग्रेसचे कुठेही नाव घेतले नाही. मात्र, चोमडेपणा आणि चाटूगिरी आम्ही करीत नसून ती कोण करते, हे यापुढे दिसून येणार. आम्ही बोललो तर, त्यांना महागात पडेल असं खोचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचं नाव न घेता केलं. संजय राऊत यांनी केलेल्या खोचक वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. पटोले म्हणाले, संजय राऊत आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत…संजय राऊत यांनी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल वक्तव्य करताना, मल्लिकार्जुन खरगे हे नाममात्र अध्यक्ष आहेत, सर्व राहुल गांधी संघटना बघतात याचं उदाहरण देवून राऊत यांनी राष्ट्रवादीचं कुणीही अध्यक्ष झालेत तरी, शरद पवारच बघतील असं वक्तव्य केलेलं आहे, याचा अर्थ काय होतो. म्हणून आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे, ते आमच्या पक्षाचे प्रवक्त्ये नाहीत. गांधी परिवारावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी विचार करूनचं बोलावं, असा आमचा सल्ला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

Published on: May 04, 2023 09:00 AM
राहुल गांधी आणि एमके स्टॅलिन यांचा NCP च्या बड्या नेत्याला फोन? अध्यक्ष निवडीशी काय संबंध?
अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, बळीराजाला मोठा फटका, पीकं उद्धस्त