सोनिया गांधींनी काँग्रेसची बैठकबोलावली , महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर चर्चेची शक्यता
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फर्निसिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरटिणीस, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची घोषणा, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या इतर प्रश्नांवर देखील यावेळी चर्चा होऊ शकते. ही बैठक 24 जून रोजी होणार आहे.