Mumbai Congress Protest | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निरुपम यांच्यासोबत काँग्रेसचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित होते.
मुंबई : राज्य तसेच देशात इंधनाचा भडका उडाला आहे. राज्यात काही जिल्ह्यात पेट्रोलने किंमत शंभरीपार गेली आहे. याच कारणामुळे काँग्रेसने मुंबईत इंधन दरवाढीविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निरुपम यांच्यासोबत काँग्रेसचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित होते. आंदोलनादरम्यान संजय निरुपम यांनी केंद्र सरकारवर गंभीर टीका केली.