Mumbai मध्ये काँग्रेसचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची किंमत कमी करा असे निवेदनही काल राज्यपालांकडे देण्यात आले आहे.
मुंबई : काँग्रेस पक्षाचे माझी सामाजिक न्याय मंत्री आणि मुंबई प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांनी गैस पेट्रोल डिझेल विरोधात चेंबूरमध्ये आंदोलन पुकारले आहे. हाय रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा आंदोलनावेळी देण्यात आल्या. देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची किंमत कमी करा असे निवेदनही काल राज्यपालांकडे देण्यात आले आहे.