पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात शाही स्वागत, फेट्यातील राजमुद्रेला काँग्रेसचा विरोध

| Updated on: Mar 06, 2022 | 11:11 AM

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. पण त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याचा कुठेही वापर करणं योग्य नाही, असं सांगत याप्रकारातून मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचं दाखवण्याचा प्रकार होत आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महापालिकेकडून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. पण त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याचा कुठेही वापर करणं योग्य नाही, असं सांगत याप्रकारातून मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचं दाखवण्याचा प्रकार होत आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. मोदींना हा फेटा घालण्यात येऊ नये, असं आवाहनही काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा विरोध दर्शविला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु आहे. राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून काँग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.