राहुलबाबा को ये क्या हुआ… भाषण सुरू अन् राहुल गांधींनी स्वतःच्या डोक्यावरच ओतली पाण्याची बाटली

| Updated on: May 29, 2024 | 12:36 PM

सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये राहुल गांधी स्वतःच्या डोक्यावरच भाषण सुरू असताना पाण्याची अख्खी बाटली उलटी करतांना दिसताय. राहुल गांधी यांच्या रॅलीत त्यांनी पाण्याने भरलेली बाटली डोक्यावर ओतल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या राज्यासह देशभरात उन्हाच्या कडाक्याने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अशातच लोकसभा निवडणूकही पार पडत आहे. कडाक्याच्या उन्हाचा फटका राजकीय नेते मंडळींनाही बसल्याचे अनेक प्रचार रॅली आणि सभांमधून पाहायला मिळाले. अशातच सध्या सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये राहुल गांधी स्वतःच्या डोक्यावरच भाषण सुरू असताना पाण्याची अख्खी बाटली उलटी करतांना दिसताय. राहुल गांधी यांच्या रॅलीत त्यांनी पाण्याने भरलेली बाटली डोक्यावर ओतल्याचे दृश्य दिसले. ते उत्तर प्रदेशातील देवरिया येथे एका सभेला संबोधित करत होते, भाषण देताना त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केली आणि नंतर म्हणाले, ‘गर्मी काफी है.’ यानंतर त्यांनी पाण्याची संपूर्ण बाटली डोक्यावर ओतली. सध्या राहुल गांधीच्या या कृतीमुळेच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.

Published on: May 29, 2024 12:36 PM
हवे तेवढे पैसे घ्या, पण… ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं? अपघातात वाचलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनं खळबळ
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की… कुणाची जिव्हारी लागणारी टीका?