काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं पक्ष सोडला अन् शिंदे गटात

| Updated on: Apr 09, 2024 | 1:09 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसमधून अनेक बडे नेते बाहरे पडत पक्षाला राम राम ठोकताना दिसताय. गेल्या काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली.’, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांचे शिवसेनेत स्वागत केल्यानंतर केले.

Published on: Apr 09, 2024 01:09 PM
मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, फडणवीसांच्या आवाहनावर राज ठाकरे काय भूमिका घेणार?
‘मविआ’चं जागावाटप जाहीर, ठाकरे गट-शरद पवार गटाला किती जागा? कोणते उमेदवार फिक्स?