माजी आमदार आशिष देशमुख यांची ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी, काय कारण?

| Updated on: May 24, 2023 | 3:18 PM

VIDEO | काँग्रेसची मोठी कारवाई, माजी आमदार आशिष देशमुख यांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन

मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्ष शिस्त मोडल्याने काँग्रसने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आशिष देशमुख यांनी वारंवार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यात आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. देशमुख यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल ५ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिलं होतं. देशमुख यांच्या या उत्तरावर शिस्त पालन समितीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Published on: May 24, 2023 03:12 PM
कुकडीच्या पाण्यावरून भाजप नेता रोहित पवार यांच्यावर बरसला; म्हणाला, ‘फक्त सोशल मीडियावर’
… म्हणून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, संजय शिरसाट यांनी थेट कारणच सांगितलं