भाजपच्या IT सेलकडून शाहूंची बदनामी? काँग्रेसचा आरोप काय? विशाळगडाच्या वादात शाहू महाराज टार्गेटवर
विशाळगडावरील अतिक्रमण वादात जमावाने गडापासून ३ किमी दूर असलेल्या गजापूर गावात नासधूस केली. ज्या गावाचा अतिक्रमणाशी संबंध नव्हता त्या गावाची तोडफोड, धार्मिक स्थळांचं नुकसान केलं. यानंतर ५०० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर त्याच ठिकाणी शाहू महाराज यांनी भेट देऊन लोकांशी संवाद साधला
विशाळगडाच्या अतिक्रमण वादात भाजप आयटी सेलकडून शाहू महाराज यांची बदनामी सुरू असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांनी केला आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. विशाळगडावरील अतिक्रमण वादात जमावाने गडापासून ३ किमी दूर असलेल्या गजापूर गावात नासधूस केली. ज्या गावाचा अतिक्रमणाशी संबंध नव्हता त्या गावाची तोडफोड, धार्मिक स्थळांचं नुकसान केलं. यानंतर ५०० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर त्याच ठिकाणी शाहू महाराज यांनी भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यावेळी भाजप समर्थक एका महिलेच्या खात्यावरून भेटीवेळचा फोटो शेअर केला गेला आणि चुकीचा मेसेज शेअर केला. भाजप समर्थकाच्या पोस्टमध्ये माफी मागितली, उद्या नाक घासणार वारसा धुळीस मिळवला असं त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. मात्र वास्तव काही वेगळंच होतं. बघा काँग्रेसने भाजपवरच काय आरोप केला?
Published on: Jul 19, 2024 12:41 PM