ऑटोवाले मुख्यमंत्री आता चार्टर्डवाले मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाची खोचक टीका?

| Updated on: Oct 09, 2023 | 6:16 PM

VIDEO | राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधांसाठी निधीची कमतरता असताना राज्य सरकार विदेश दौऱ्यावर करोडो रुपये खर्च करीत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. तर ऑटोवाले मुख्यमंत्री म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर खोचक टीकाही केली.

नागपूर, ९ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधांसाठी निधीची कमतरता असताना राज्य सरकार विदेश दौऱ्यावर करोडो रुपये खर्च करीत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. तर ऑटोवाले मुख्यमंत्री आता चार्टर्डवाले मुख्यमंत्री झाले, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर खोचक टीकाही केली. दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारतर्फे तब्बल 32 कोटी खर्च करण्यात आल्याचा दावा लोंढे यांनी केला. मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ वेळेत मुंबईत पोहचण्यासाठी चार्टर्ड विमानाच्या खर्चाचे 1 कोटी 89 लाख 87 हजार 135 रुपयांचा खर्च केल्याचे लोंढे यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अचानक ठरलेल्या मुंबई दौऱ्यामुळे दावोस येथे गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाला अचानक मुंबईत परत यावे लागल्यामुळे चार्टर्ड विमानाचे कारण सांगण्यात आले, मात्र पंतप्रधान यांचा कुठला दौरा अचानक ठरत नाही त्यामुळे दिलेले कारण हास्यास्पद असल्याची टीका अतुल लोंढे यांनी केली.

Published on: Oct 09, 2023 06:16 PM
Sanjay Shirsat यांनी काढली संजय राऊत यांची लायकी; म्हणाले, लायकी नसलेले लोकं…
Uddhav Thackeray गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? पालिकेची परवानगी कुणाला मिळाली? अनिल परब म्हणाले…