मोदी अन् शहांची नाना पटोले यांनी काढली लायकी? आक्रमकतेने म्हणाले, देश चालवण्याच्या…

| Updated on: Mar 01, 2024 | 2:20 PM

जे.पी. नड्डा का येतात? अमित शाह का येतात? मोदी का येतात? जनता आमच्या बाजूने आहे. आम्ही सर्वेवर जाऊ शकत नाही. मोदी है तो मुमकीन है. ते का येतात? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत भाजपच्या बड्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबई, १ मार्च २०२४ : ‘ जे.पी. नड्डा का येतात? अमित शाह का येतात? मोदी का येतात? दुसऱ्या राज्यात का जात नाही. आमची तयारी नसतील तर आलेच नसते. आमची तयारी बरोबर आहे. जनता आमच्या बाजूने आहे. आम्ही सर्वेवर जाऊ शकत नाही. मोदी है तो मुमकीन है. ते का येतात?’ असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत भाजपच्या बड्या नेत्यांवर निशाणा साधला ते पुढे असेही म्हणाले की, कसब्याच्या निवडणुकीत अमित शाह आले. त्यांना देश चालवायला दिला आहे आणिते प्रचार करतात. ते प्रचारक आहेत. संघात प्रचारक असतात ते प्रचार करण्यासाठी ठेवलेले असतात. त्यांना प्रचारक ठेवावं. ते देश चालवण्याच्या लायकीचे नाही, असे म्हणत नाना पटोले यांची आक्रमक भाषा पाहिला मिळाली. तर कोरोनात लोक मरत होते. गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी हजारो कोटी दिले. ती साफ झाली नाही. कोरोनात त्या नदीत प्रेते तरंगत होती. मोदी आणि अमित शाह वेस्ट बंगालमध्ये दीदी करत होते, असे म्हणत पटोलेंनी हल्लाबोल केलाय.

Published on: Mar 01, 2024 02:18 PM