BJP नं लावलेली जाती-जातीमधील आग आता पेटायला लागलीये, कुणाची भाजपवर गंभीर टीका

| Updated on: Oct 14, 2023 | 4:08 PM

VIDEO | मराठ्यांविरोधात टीका करून फूस लावायची आणि हिंसा होईल असे झाले की, मराठा आरक्षण नाकारलं जाईल असा त्यामागील डाव असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले तर सत्तेत येण्यासाठी भाजपनं जाती-जातीतील वणवा पेटवला असल्याची गंभीर टीका नाना पटोले यांनी केली

नागपूर, १४ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून एल्गार पुकारला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी चांगलंच घेरलंय. मराठ्यांविरोधात टीका करून फूस लावायची आणि हिंसा होईल असे झाले की, मराठा आरक्षण नाकारलं जाईल असा त्यामागील डाव असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. जरांगे पाटील काय बोलताय, पण मी तुम्हाला ज्या मुळावर घेऊन जातोय, ज्यांनी हा जाती-जातीमधील वणवा पेटवलाय. जे केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेले आहेत. त्यांना प्रश्न विचारा असे म्हणत सत्तेत येण्यासाठी भाजपनं जाती-जातीतील वणवा पेटवला आहे. तर माणसाला माणसाशी भांडायला लावायचा प्रयत्न भाजप करत आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी ही गंभीर टीका केलीये. जरांगे पाटील काय बोलताय हा विषय नाही तर सरकारमधील सत्तेत बसलेल्या लोकांनी हा वणवा पेटवलाय आणि ते आता थांबलं पाहिजे, असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Published on: Oct 14, 2023 04:08 PM