‘महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे तर येड्यांचं सरकार’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Aug 21, 2023 | 7:36 PM

VIDEO | 'महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे तर, येड्यांचं सरकार आहे. बेरोजगारांना नोकरी देण्यापेक्षा बेरोजगारांचे खिसे कापण्यावर त्यांचा जास्त जोर आहे', काँग्रेसच्या बड्या नेत्याची सरकारवर सडकून टीका

भंडारा, २१ ऑगस्ट २०२३ | ‘महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचं नव्हे तर, येड्यांचं सरकार आहे. बेरोजगारांना नोकरी देण्यापेक्षा बेरोजगारांचे खिसे कापण्यावर त्यांचा जास्त जोर आहे.’, असी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागलं. औरंगाबाद शहरातील पीएस महाविद्यालयात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनचा फटका विद्यार्थ्यांना बसला. सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकलं नाही. तब्बल पाऊण तासानंतर सर्व्हर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर सडकून टीका केली. दोन हजार जागांसाठी 15 – 15 लाख अर्ज येतात. त्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारल्या जाते. अरबो रुपये जमा केले जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Published on: Aug 21, 2023 07:31 PM
गिरणी कामगारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, लवकरच मिळणार आनंदाची बातमी
‘काहीजण डोळे वटारल्यावर पळाले’, उद्धव ठाकरे यांनी कुणावर केली अप्रत्यक्ष टीका