महाराष्ट्रातले पाणी गुजरातला पाठवलं, नाना पटोले यांचा आरोप
"राज्याचे मुख्यमंत्री औरंगाबामध्ये भाषण करताना म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं हस्तक बनून रहायला आवडेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच हस्तक असलं पाहिजे"
मुंबई: “राज्याचे मुख्यमंत्री औरंगाबामध्ये भाषण करताना म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं हस्तक बनून रहायला आवडेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच हस्तक असलं पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री सत्तेच्या जोमात आहेत. दिल्लीतलं नरेंद्र मोदी सरकार जे सांगतय तसंच ते करतायत. राज्यातल पाणी गुजरातला दिलं. गुजरातच्या नेत्यांचा आशिर्वाद मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचा प्रयत्न होतोय. भाजपाचे महाराष्ट्रातले नेते हे काम करतायत” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
Published on: Sep 14, 2022 01:25 PM