कसबा, चिंचवड निवडणुकीबाबत ‘मविआ’चा आज निर्णय, यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी
कसबा पेठची जागा काँग्रेस तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवणार, ठाकरे गटाचा उमेदवार असण्याची शक्यता कमी असून आज मविआ अंतिम निर्णय घेणार...
मुंबई : कसबा पेठची जागा काँग्रेस तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाचा उमेदवार असण्याची शक्यता कमी असून आज महाविकास आघाडी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. विरोधकांना स्वतः फोन करून निवडणूक बिनविरोध करण्यास विनंती करणार आहे, कसबा आणि चिंचवड निवडणुकीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबे आज राजकीय भूमिका मांडणार असून सत्यजित तांबे कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.
तर सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यासाठी शरद पवार यांनी खर्गेंना फोन करून सांगितले होते, पण उमेदवारी दिली आणि गडबड झाली असल्याचे म्हणत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तांबे परिवाराशी वैर नाही, सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय हायकंमाड घेईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे.