नागपुरातील मांढळ बाजार समितीत काँग्रेसचा गुलाल, कुणाला मोठा धक्का?

| Updated on: Apr 29, 2023 | 2:21 PM

VIDEO | नागपूर जिल्ह्यातील मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय, कुणाचा झाला दारूण पराभव

नागपूर : नागपूरातील जिल्ह्यातील मांढळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. तर मांढळमध्ये भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांना मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. मांढळमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठी चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूरातील जिल्ह्यातील मांढळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांचा दारूण पराभव करत हा विजय मिळवला. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. २८ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकांचा निकाल हाती येऊ लागला आहे. ग्रामीण भागातील राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. (Agricultural Market Committee Election) यासाठी शुक्रवारी मतदान पार पडलं होतं.

Published on: Apr 29, 2023 02:19 PM
साताऱ्यामध्ये शेतकरी विकास पॅनलचा डंका, ‘मविआ’चा सुपडासाफ
रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांचा पराभव; पाहा व्हीडिओ…