75 व्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा ‘चले जाव’चा नारा द्यायचा, Bhai Jagtap यांचा BJP ला टोला
आमचं स्वातंत्र हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. काल आमची काँग्रेस पक्षाची बैठक झाली आहे. त्यामध्ये आम्ही एक नवीन कार्यक्रम पूर्ण वर्षासाठी हाती घेत आहोत. भाजप विरोधात आपण पूर्ण देशभर आंदोलन करायचं आहे, असे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सांगितले.
मुंबई : या दिवशी इथून प्रेरणा घेऊन आपण राज्यभर अन्यायाच्या विरोधात काम करत असतो. तो काळ इंग्रजांचा होता. त्यावेळी आपण इंग्रजांना चले जाओचा नारा दिला होता. आता 75व्या स्वातंत्र दिनी पुन्हा एकदा चले जाओचा नारा द्यायचा आहे. या मंचावरून 79 वर्षांपूर्वी जो नारा दिला होता तो आज पुन्हा आपण आज बीजेपी चले जाओचा नारा देत आहोत. आमचं स्वातंत्र हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. काल आमची काँग्रेस पक्षाची बैठक झाली आहे. त्यामध्ये आम्ही एक नवीन कार्यक्रम पूर्ण वर्षासाठी हाती घेत आहोत. भाजप विरोधात आपण पूर्ण देशभर आंदोलन करायचं आहे, असे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सांगितले.