सत्यजित तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेसमध्ये खदखद, यासह जाणून घ्या महत्त्वाच्या बातम्या
मला उमेदवारी मिळू नये, यासह बाळासाहेब थोरात यांच्या बदनामीसाठी षडयंत्र सुरू, सत्यजित तांबे यांचा नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई : सत्यजित तांबे यांच्या आरोपानंतर आता काँग्रेसमध्ये खदखद पाहायला मिळत आहे. काँग्रसेच्या बड्या नेत्यांची बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा तर हा वाद हायकमांडकडे जाण्याची शक्यता आहे. मला उमेदवारी मिळू नये, यासह बाळासाहेब थोरात यांच्या बदनामीसाठी षडयंत्र सुरू असल्याचा सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तर माझ्याकडे खूप काही आहे, पण योग्यवेळी सर्व बाहेर काढेन, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले असून सत्यजित तांबेंना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणला, नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध काँग्रेसची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून हेंमत रासणे यांना उमेदवारी निश्चित तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जात असून आज उमेदवारी जाहीर होणार आहे.