ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, अंनिसच्या श्याम मानव यांचा खळबळजनक दावा
ठाकरे पिता-पुत्राना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता. ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, असंही सांगितलं गेल्याचं श्याम मानव यांनी म्हटलं. तर प्रतिज्ञापत्रावर सही केली तर ठाकरे जेलमध्ये जातील म्हणून अनिल देशमुख यांनी नकार दिला. दरम्यान, सही न देता अनिल देशमुख १३ महिने जेलमध्ये राहिले, असा दावाही श्याम मानव यांनी केला
ED कारवाईपासून वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांना ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केला आहे. ठाकरे पिता-पुत्राना अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता. ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, असंही सांगितलं गेल्याचं श्याम मानव यांनी म्हटलं. तर प्रतिज्ञापत्रावर सही केली तर ठाकरे जेलमध्ये जातील म्हणून अनिल देशमुख यांनी नकार दिला. दरम्यान, सही न देता अनिल देशमुख १३ महिने जेलमध्ये राहिले, असा दावाही श्याम मानव यांनी केला. अनिल देशमुख यांनी त्या प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही, यामुळे शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चौघे नेते वाचले आणि अनिल देशमुख कारागृहात गेले, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.