Pune | भारतीय सैन्य दलासाठी मांउटेन फूट ब्रिज, WOM आणि डीआरडीओ यांची निर्मिती
या ब्रिजचे वैशिष्ट्ये म्हणजे 15 जवान 90 मिनिटात उपकरण न वापरतात ब्रिज तयार करू शकतात. ब्रिजचा कुठलाही पार्ट 18 किलो त्यापेक्षा अधिक नाही. हा ब्रीज पूर्णपणे मानवनिर्मित आहे.
पुणे : आत्मनिर्भर भारत या योजने अंतर्गत भारतीय सैन्य दलासाठी आपत्तीच्या वेळी मांउटेन फूट ब्रिजची निर्मिती करण्यात आली आहे. वर्ल्डवाईड ऑईलफिल्ड मशीन प्राव्हेट लिमिटेड कंपनी आणि डीआरडीओ यांनी या मांउटेन फूट ब्रिजची निर्मिती केली आहे. सुरवातीला तीस ब्रिज WOM कंपनी निर्मिती करून देणार आहे. दुर्गम आणि सीमेवर आपत्तीच्या वेळी या ब्रिजची मोठा उपयोग होणार आहे. या ब्रिजचे वैशिष्ट्ये म्हणजे 15 जवान 90 मिनिटात उपकरण न वापरतात ब्रिज तयार करू शकतात. ब्रिजचा कुठलाही पार्ट 18 किलो त्यापेक्षा अधिक नाही. हा ब्रीज पूर्णपणे मानवनिर्मित आहे.