कलेक्टरिन बाईंची खोटे प्रमाणपत्र देऊन नियुक्ती? IAS अधिकारी पूजा खेडकर कोंडीत?

| Updated on: Jul 14, 2024 | 11:13 AM

अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिव्यांग प्रमाणपत्र पूजा खेडकरांना दिल्याचे दस्ताऐवज तपासताना समोर आले आहे. २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग तर २०२१ मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र रूग्णालयाने दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यूपीएसच्या परीक्षेत याच प्रमाणपत्राद्वारे पूजा खेडकरांनी नियुक्ती?

IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात नव-नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पूजा खेडकरांसह मनोरमा आणि दिलीप खेडकर यांचे कारनामे समोर येत आहेत. अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिव्यांग प्रमाणपत्र पूजा खेडकरांना दिल्याचे दस्ताऐवज तपासताना समोर आले आहे. २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग तर २०२१ मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र रूग्णालयाने दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यूपीएसच्या परीक्षेत याच प्रमाणपत्राद्वारे पूजा खेडकरांनी नियुक्ती मिळवल्याचा दावा करण्यात येतोय. यूपीएसी देताना पूजा खेडकर यांनी अशंतः अंधत्व असल्याचे प्रमाणपत्र दिलं. मात्र नंतर वैद्यकीय चाचण्यांवेळी विविध कारणं देत पूजा खेडकर ६ वेळा गैरहजर राहिल्या. याच दरम्यान, एमआरआय करण्याचेही प्रयत्न झाले पण पूजा खेडकरांनी त्यालाही नकार दिला. पण त्यांनी स्वतःच एका एमआरआय सेंटरमधून यूपीएससीला रिपोर्ट सादर केले. यावरूनच आता त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Published on: Jul 14, 2024 11:13 AM