IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्याविरोधात दबंगगिरी; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 12, 2024 | 5:40 PM

पूजा खेडकर यांच्या आईचा धमकी देतानाचा हा व्हिडीओ असून हातात पिस्तुल घेऊन पुण्यातील मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ व्हायरल...

Follow us on

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पूजा खेडकर यांच्या आईचा धमकी देतानाचा हा व्हिडीओ असून हातात पिस्तुल घेऊन पुण्यातील मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती, ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या, आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. पूजा खेडकर यांच्या आईच्या या दबंगगिरीमुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.