Digvijaya Singh | जीन्सवाल्या पोरींना मोदी आवडत नाहीत, दिग्विजय सिंह यांचं वादग्रस्त विधान

| Updated on: Dec 26, 2021 | 3:23 PM

भोपाळमध्ये जन जागरण अबियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. जीन्स परिधान करणाऱ्या मुलींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे, असं विधान दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

भोपाळमध्ये जन जागरण अबियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. जीन्स परिधान करणाऱ्या मुलींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे, असं विधान दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. जीन्स परिधान करणाऱ्या आणि मोबाईल बाळगणाऱ्या मुली मोदींमुळे प्रभावित नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलाच मोदींवर प्रभावित आहेत, असं सांगतानाच 2024मध्ये मोदी पुन्हा विजयी झाल्यास सर्वात आधी देशाचं संविधान बदललं जाईल. जे काही आरक्षण मिळतंय तेही बंद केलं जाईल. कारण भाजप रशिया आणि चीनचं मॉडल फॉलो करत आहेत, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 December 2021
अंबरनाथमध्ये लष्करी जवानाला मारहाण करणारे पोलिसांच्या अटकेत