… तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Sep 23, 2024 | 5:32 PM

कोल्हापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देत गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी पडळकरांनी धनगर समाज बांधवांमुळे बकऱ्याचं बटण मिळत असल्याचं म्हटलं.

Follow us on

राज्यात सध्या आरक्षणाचा विषय चांगलाच गाजत आहे. त्यामध्ये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू आहे. तर, दुसरीकडे विविध जिल्ह्यात धनगर समाजही आक्रमक झाला आहे. एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज आंदोलन करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून 6 जणांचे उपोषण सुरू असून आज कोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आम्ही शेळ्या मेंढ्या पाळणं सोडलं तर कुत्र्यांचं मटण खावं लागेल, कोल्हापुरातील धनगर आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘जेव्हा धनगर समाज शेळ्या मेंढ्या राखणं बंद होईल तेव्हा महाराष्ट्रातील लोकांना कुत्र्यांच मटण खावं लागेल. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. ‘, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, कोल्हापुरला आल्यावर सगळ्यांना वाटतं बोकडाचं मटण खावं, तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा तुम्ही खाता. पण तुम्ही धनगराला मारता… तुमचं आम्ही काय मागत नाही. सरकार कोणती सुविधा देत नाही पण फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारतात. यानंतर पोलीस कोणतीही दखल घेतल नाही. जर धनगरांनी शेळ्या मेंढ्या राखणं बंद केलं तर काय होईल आवस्था? असा आक्रमक सवालच गोपीचंद पडळकर यांनी सरकारला केला आहे.