नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पोलिसांच्या पत्नी आक्रमक; म्हणाल्या.. दिडफुट्या, तू हिरो आहेस का?
भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर पोलिसांच्या पत्नीने पोलीस आयुक्तांकडे नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या कारवाईच्या मागणीनंतर नितेश राणे यांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय
मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४ : अकोल्यातील एका सभेमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर पोलिसांच्या पत्नीने पोलीस आयुक्तांकडे नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या कारवाईच्या मागणीनंतर नितेश राणे यांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, नितेश राणे यांनी जाहीरपणे पोलीस खात्याची माफी मागावी, अशी मागणी पोलिसांच्या पत्नींकडून करण्यात आली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडूनच पोलिसांचं खच्चीकरण सुरू असल्याची टीका विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही सरकार गप्प का? असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. तर अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या बाजून सागर बंगला आहे. नितेश राणे सेलिब्रिटी आहे. बड्या नेत्याचा मुलगा असल्याचा घणाघाती हल्लाबोल रोहित पवार यांनी केलाय. सागर बंगल्याला सांगा गरिबाला वाचवा, अशा नेत्यांना बाजूने सागर बंगला का आहे? असा सवाल ही रोहित पवार यांनी केलाय.