बापूंचा अपमान अन् भिडे यांच्याविरोधात संताप; ‘फाशी देणार का, सांगावं?’, देवेंद्र फडणवीस यांना कुणाचा सवाल?
VIDEO | संभाजी भिडे यांच्याविरोधात वातावरण तापलं, विरोधक आक्रमक; थेट केली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फाशी देण्याची मागणी
मुंबई, 30 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. इतकेच नाहीतर त्यांचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भिडे यांच्या या विधानावर सर्वसामान्यांमधूम संतापाची भावना व्यक्त होत आहे. तर काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केलं आहे. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संभाजी भिंडे यांना फाशी द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महात्मा गांधी यांचा अपमान करणारं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केल्यामुळे राज्यात पुन्हा त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे. तर याप्रकरणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची चौकशी करणार असल्याचे म्हणत भाजपनं उत्तर दिले आहे. यावर सत्ताधारी भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे, बघा व्हिडीओ…
Published on: Jul 30, 2023 09:13 AM