वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड; रामगिरी महाराज माफी मागणार? भूमिकेविषयी म्हणाले, मी चूक…

| Updated on: Aug 18, 2024 | 1:37 PM

रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेशही देण्यात आलेत. तर दुसरीकडे रामगिरी महाराज यांच्याविरोधात कलम २९९ आणि कलम ३०२ नुसार, महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Follow us on

नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावात आयोजित प्रवचनादरम्यान सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम धर्माकडून केली जात आहे. या सगळ्या प्रकरणानंतर रामगिरी महाराज दिलगिरी व्यक्त करणार की नाही? याकडे साऱ्याचे लक्ष असताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, चूक केली असं वाटत नाही, असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केले आहे. माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही’, असंही रामगिरी महाराज म्हणालेत. तर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर चांगलीच टीका होतांना दिसतेय. मात्र तरी देखील रामगिरी महाराज यांच्याकडून कोणतीही दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली नाही. तर केलेल्या वक्तव्यानंतर होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण देताना रामगिरी महाराज म्हणाले, छोटीशी क्लिप बाजूला काढून संभ्रम निर्माण केला गेला आहे.