जात सर्व्हेक्षणावरुन मराठी कलाकारांमध्ये कल्ला, कानाखाली अन् लाथ मारण्याची थेट कुणाची भाषा?
सरकारकडून मराठा सर्वेक्षणासाठी सर्व्हे सुरू केला. त्या सर्व्हेवरून मराठा कलाकार पुष्कर जोग आणि केतकी चितळे यांनी केलेली विधानं चांगलीच वादात सापडली आहे. पोस्ट करत काय म्हणाला पुष्कर जोग? या वादग्रस्त पोस्टवर ठाकरे गटात प्रवेश केलेले मराठी कलाकार आणि नेते किरण माने यांनी प्रत्युत्तर दिलंय. बघा काय म्हणाले किरण माने बघा स्पेशल रिपोर्ट....
मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : जात सर्वेक्षणावरून मराठी कलाकारांमध्ये चांगलाच कल्ला रंगला आहे. टीकेनंतर पुष्कर जोग याने वादग्रस्त पोस्ट हटवल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून मराठा सर्वेक्षणासाठी सर्व्हे सुरू केला. त्या सर्व्हेवरून मराठा कलाकार पुष्कर जोग आणि केतकी चितळे यांनी केलेली विधानं चांगलीच वादात सापडली आहे. सर्वेक्षणासाठी काम करणारे कर्मचारी आपले कर्तव्य बजावताय. सरकारी निर्देशांचं पालन करताय. त्यावर आक्षेप असेल तर सरकारला प्रश्न अथवा सरसकट टीकेचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यावर बोलण्याची हिंमत न दाखवता, या दोन्ही कलाकारांनी सरकारी कर्मचाऱ्यांनाच टार्गेट केल्याने ते दोघंच टीकेचे धनी बनलेत. पोस्ट करत काय म्हणाला पुष्कर जोग? या वादग्रस्त पोस्टवर ठाकरे गटात प्रवेश केलेले मराठी कलाकार आणि नेते किरण माने यांनी प्रत्युत्तर दिलंय. बघा काय म्हणाले किरण माने बघा स्पेशल रिपोर्ट….