दादाचा वादा…’लाडकी बहीण’ची जाहीरात वादात, सरकारची योजना अन् प्रचार अजित पवारांचा; विरोधकांचा निशाणा

| Updated on: Sep 04, 2024 | 5:19 PM

महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान, याच योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगत असल्याचा आरोप विऱोधकांकडून केला जात आहे. या श्रेयवादाच्या राजकारणात अजित पवार गट आणि शिंदे गट आमने-सामने आलेत.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राज्यभरात आपली जनसन्मान यात्रा करत राज्य पिंजून काढत आहे. याच माध्यमातून महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गुलाबी कॅम्पेन सुरू केले आणि ते चर्चेचा विषय ठरतंय त्यातच आता अजित पवार यांनी थेट लाडकी बहीण योजनेचे श्रेय महायुतीच्या नेत्यांना वगळून एकट्यानेच घेण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे म्हटलं जातंय. कारणही तसंच आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून तिथे ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाईन वापरण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच अजित पवार यांची ही जाहीरात वादात सापडली आहे. तर विरोधकांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शासनाची योजना, जनतेचा पैसा मात्र अजित पवार यांचा प्रचार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे सरकारी तिजोरीतील आहेत. दादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून योजना चालवत आहे का? असा सवाल काँग्रेसने करत अजितदादांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.

Published on: Sep 04, 2024 05:19 PM
‘आता अचानक आठवण झाली, तुम्ही मुसलमान आहात?’, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून कोणावर आगपाखड?
गौतमी पाटील सोबतचा ‘तो’ व्हिडीओ वडेट्टीवारांकडून ट्वीट; म्हणाले, भाजप आमदार म्हणजे ‘एक ना धड…’