Special Report | संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांमध्ये टोकाचं वितुष्ट? चौकीदार नाराज? ‘मविआ’चं काय होणार?
VIDEO | महाविकास आघाडीची ढाल आणि तलवार मानले जाणारे संजय राऊत नाराज, काय आहे कारण...बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : महाविकास आघाडीची ढाल आणि तलवार मानले जाणारे संजय राऊत सध्या नाराज असल्याचं दिसतंय. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल बोलताना राऊतांचे सूर बदलले आहेत. राऊतांचे बदललेले सूर, सुषमा अंधारेंनी अजितदादांची पवारांकडे केलेली तक्रार, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांमधला वाद यावरुन मविआतच सगळं आलबेल आहे की नाही? हा प्रश्न निर्माण झालाय. स्वत:ला महाविकास आघाडीचा चौकीदार म्हणणारे, महाविकास आघाडीची ढाल बनून वार झेलणारे आणि महाविकास आघाडीची बाजू माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येत भक्कमपणे मांडणारे संजय राऊत नाराज झाले आहेत का? संजय राऊतांमध्ये आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टोकाचं वितुष्ट आलंय का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामागचं कारण आहे, संजय राऊतांचा बदललेला सूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. पण राऊतांनी आपल्या चाकोरीबाहेरचं उत्तर दिलं. “राष्ट्रवादीचे वाघ याच्यावर डरकाळी फोडतील”, असं राऊत म्हणाले. संजय राऊतांना आजही अजित पवार आणि नाना पटोलेंबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्याही वेळी राऊतांनी या दोन नेत्यांवर बोलणं टाळलं आणि जाता जाता टोलाही लगावला. काय म्हणाले संजय राऊत बघा स्पेशल रिपोर्ट…