अनंत चतुर्दशीलाच राडा! शिवसेना आणि शिंदे गटांतील वाद

| Updated on: Sep 11, 2022 | 12:51 PM

दरम्यान 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आलीये. शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर हा वाद समोर आलाय.

शिंदे गटाचे कार्यकर्ते (Eknath Shinde Group) आणि शिवसैनिक (Shivsainik) एकमेकांना भिडलेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी ठाकरे गटावर मारहाणीचा आरोप केलाय. ठाकरे गटातील महेश सावंत यांच्यावर हा आरोप करण्यात येतोय. शिवाय शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांवर दादर पोलिस स्टेशनच्या (Dadar Police Station) आवारात गोळीबार केल्याचा आमदार सुनिल शिंदे यांनी आरोप केलाय. दरम्यान 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आलीये. शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर हा वाद समोर आलाय.

 

 

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षकांचा मोर्चा
Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे अधिवेशन, 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष महत्त्व