सहकारी संस्थांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील 428 सहकारी संस्थांना ‘इतक्या’ कोटींचे अनुदान
VIDEO | आता सहकारी संस्थांच्या व्यवसायाला आणि प्रकल्पांना मिळणार प्रोत्साहन, सहकारी संस्थांसाठी सरकारने घेतला मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, राज्यातील 428 सहकारी संस्थांना 72 कोटींचे अनुदान तसेच कर्ज वाटपाचा निर्णय
मुंबई, ५ सप्टेंबर, २०२३ | राज्यातील साधारण ४२८ सहकारी संस्थांना त्यांच्या व्यवसाय आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी ७२ कोटी रूपयांचे अनुदान तसेच कर्ज महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून वाटप करण्यात येणार आहे. व्यवसाय आणि प्रकल्पांना प्रोत्सहन देण्यासाठी ७२ कोटी रुपयांचे अनुदान तसेच कर्ज वाटपाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तत्कालीन सरकारच्या काळात हे अनुदान देण्यात येणार होते. मात्र राज्यात सरकारच्या बदलांचा परिणाम सहकारी संस्थांना बसल्याने संस्थांना अनुदानापासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी बैठक घेऊन अनुदान वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सहकारी संस्था मोठा पाठिंबा आणि बळ मिळणार आहे.
Published on: Sep 05, 2023 09:28 AM