VIDEO : Sanjay Raut | मविआ सरकारचं काम उत्तम चाललंय – खासदार संजय राऊत
महाविकास आघाडीमध्ये समन्वय चांगला आहे आणि उत्तम नातं आहे. एकमेंकाना समजून घेतले जाते. कामाच्या पध्दतीने मतभेद असू शकतात. मात्र, याचा अर्थ कोणी नाराज आहे असा असू शकत नाही.
महाविकास आघाडीच्या सरकारचं काम उत्तम चाललंय असं आज पत्रकारांना बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे संजय राऊत म्हणाले की, नेहमीच अशा अफवा पसरवल्या जातात की, शिवसेना नाराज आहे तर कधी काँग्रेस नाराज आहे. पण हे चुकीचे आहे आणि हे सर्व थांबवले पाहिजे. कारण सरकारला आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि सरकार चालत देखील आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय चांगला आहे आणि उत्तम नातं आहे. एकमेंकाना समजून घेतले जाते. कामाच्या पध्दतीने मतभेद असू शकतात. मात्र, याचा अर्थ कोणी नाराज आहे असा असू शकत नाही असे संजय राऊत म्हणाले…