‘जलसा’वर कोरोनाचं सावट, अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

| Updated on: Jan 05, 2022 | 12:53 PM

अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरावरही कोरोनाचं सावट आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. इंडिया टुडेने आपल्या एका वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, अमिताभ बच्चन यांच्या घरातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अहवालात असे लिहिले आहे की, रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कार्डिलिया क्रूझवरील 2 हजारपेक्षा जास्त प्रवाशांच्या कोरोना टेस्ट
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप