Hasan Mushrif | कोल्हापुरातील रुग्ण वाढत असल्याने थोडा संयम बाळगा, हसन मुश्रीफांचं जनतेला आवाहन
कोल्हापुरातील रुग्ण वाढत असल्याने थोडा संयम बाळगा, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी जनतेला केलं आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे.
कोल्हापुरातील रुग्ण वाढत असल्याने थोडा संयम बाळगा, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी जनतेला केलं आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतं. या पथकाने जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला. चार सदस्यीय हे पथक दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाशी सोबत घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, त्याचबरोबर लसीकरण केंद्रांना देखील भेटी देणार आहे.
देशात आणि राज्यात बहुतांश ठिकाणी कोरूना परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. दिवसाला अजूनही एक हजार ते पंधराशे नवे रुग्ण आढळत असून पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे. एका बाजूला राज्यात तिसरा लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच कोल्हापूर जिल्हा मात्र अजूनही दुसऱ्या लाटेतून मुक्त झालेला नाही.