Special Report | दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढला

| Updated on: Dec 05, 2021 | 10:49 PM

दक्षिण आफ्रिकेत या आधीच्या कोरोनालाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. मात्र, आता ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे. ओमिक्रॉनच्या उदयानंतर लहान मुलांना कोरोना होणाचं प्रमाण वाढलंय. दक्षिण आफ्रिकेत या आधीच्या कोरोनालाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. मात्र, आता ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 0 ते 5 वयोगटातील मुलांच्या बाधितांचं प्रमाण समान असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. मुलांमध्ये आणि गरोदर महिलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण का वाढत आह? याचा अभ्यास केलं जाणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या उदयानंतर 9 पैकी सात राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ झालीय. कोरोनाबाधितांमध्ये लसीकरण न झालेल्याचं प्रमाण जास्त असल्यानं लसीकरणाला वेग आलाय. सध्य दक्षिण आफ्रिकेत ख्रिसमसच्या सुट्या असल्यानं लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आलीय. आफ्रिकेतील झांबिया आणि उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशामध्येही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आलाय.

Special Report | पुण्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं
Special Report | ममतांच्या दौऱ्यानंतर राजकीय वादळ, भाजप आणि आघाडीत वार-पलटवार