नागपुरात कोरोना रुग्ण वाढले, शुक्रवारी दिवसभरात 12 जणांना कोरोनाची लागण
नागपूरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरात 12 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
नागपूर: कोरोनाची लाट वसरली आहे असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाने हळूहळू राज्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या चार -पाच दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये देखील गेल्या चोवीस तासांमध्ये 12 रुग्णांची नोंद झाली आहे. इंग्लंडवरून नागपुरात परतलेली महिलेला देखील कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या महिलेच्या तपासणीचे नमुने निदानासाठी पुढे पाठवण्यात आले आहेत.