द. आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनचा अहवाल सात दिवसात येणार
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सहाही जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल येत्या सात दिवसात येणार आहे.
पुणे : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सहाही जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल येत्या सात दिवसात येणार आहे. त्यामुळे या सहाही जणांचे अहवाल काय येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबतची माहिती दिली. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर तातडीने पावले उचलली आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची दोन गटात विभागणी केली आहे. जिल्हा निहाय त्याची वर्गवारी केली आहे. आतापर्यंत सहा प्रवासी दक्षिण आफ्रिका, नायजेरीया आणि झांबियातून आले आहेत. ते पॉझिटीव्ह आले आहेत, असं आवटे यांनी सांगितलं.