नागपूरात आजपासून कडक निर्बंध, जिम ५० टक्के क्षमतेने सुरु
नागपूरात आजपासून कडक निर्बंध लागू करण्यात आलेय. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी आदेश जारी केलेय.
मुंबई : नागपूरात आजपासून कडक निर्बंध लागू करण्यात आलेय. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी आदेश जारी केलेय. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असून. सरकारी, खाजगी कार्यालय, मॉल, कार्यक्रमांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे निर्बंध आहेत. नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. नव्या निर्बंधांनुसार आज सकाळपासून नागपूरातील जिम ५० टक्के क्षमतेने सुरु झाले आहेत.