कोरोना पुन्हा आलाय… ‘या’ रुग्णांनी काळजी घ्या; मुंबई महापालिकेच्या तातडीच्या सूचना

| Updated on: Dec 21, 2023 | 5:04 PM

देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्याने महाराष्ट्रातील काही राज्यांची चिंता वाढल्याचे दिसतंय. डिसेंबर महिन्यापासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर येथे कोरोनाच्या नव्या JN व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केल्याने खळबळ

मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्याने महाराष्ट्रातील काही राज्यांची चिंता वाढल्याचे दिसतंय. डिसेंबर महिन्यापासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर येथे कोरोनाच्या नव्या JN व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. अशातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात BMC च्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, हा व्हेरियंट ओमिक्रॉनचा आहे. JN1 हा व्हेरिएंट माईल्ड प्रकाराचा आहे. मुंबई महानगरपालिकेकडून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरटीपिसीआर टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हृदयाचे तसेच डायबेटिसचे रुग्ण आहेत. त्यांनी जरा विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन बेड्स, आयसीयू तसेच इतर यंत्रणा तयार आहेत आम्ही वारंवार सूचना आणि मार्गदर्शन घेत आहोत. हा व्हेरियंट सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचेही दक्षा शहा यांनी सांगितले आहे.

Published on: Dec 21, 2023 05:04 PM
चिलीम मारून भाजप पक्ष फोडतो, पक्षफोडीवरून कुणाची जहरी टीका?
Jarange Patil Live : आईची जात मुलाला लावा… मनोज जरांगे यांची ‘ती’ मागणी सरकारने फेटाळली