Corona Vaccination | उद्यापासून 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण, राजेश टोपेंची माहिती

| Updated on: Jun 21, 2021 | 10:16 PM

18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण उद्यापासून केलं जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लसीकरणाची गती वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात 22 जून अर्थात उद्यापासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण उद्यापासून केलं जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लसीकरणाची गती वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं टोपे म्हणाले. त्यामुळे 18 वयापासून पुढील सर्वांनी आपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर जाऊन कोरोना लस घ्यावी अशी विनंती टोपे यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वीच 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने लसीच्या तुटवड्यामुळे अद्याप 18 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात नव्हती. मात्र, आता 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस दिली जाणार आहे.

Special Report | पवारांचा ‘पॉवर गेम’, मोदींविरोधात तिसरी आघाडी? नावही ठरलं?
Pune Avinash Bhosale | उद्योजक अविनाश भोसलेंना दणका, ईडीकडून नागपूर, पुण्यातील मालमत्ता सील