Vaccine for Kids | लहान मुलांच्या लसीला मान्यता, यशस्वी चाचणी करणारे डॉक्टर वसंत खळतकर LIVE
कोरोना लढाईविरोधात आता आणखी एक शस्त्र भारताच्या ताफ्यात जमा झालं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. 2 ते 18 वर्षांच्या मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) लस दिली जाऊ शकणार आहे.
कोरोना लढाईविरोधात आता आणखी एक शस्त्र भारताच्या ताफ्यात जमा झालं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. 2 ते 18 वर्षांच्या मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) लस दिली जाऊ शकणार आहे. त्यामुळे आता कोरोनाविरुद्धची लढाई आणखी बळकट झाली आहे. असं असलं तरी या लसीबाबत लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्या शंकांचं निरसन तज्ज्ञांनी केलं आहे.
लहान मुलांसाठी आता कोरोना लस उपलब्ध झाली आहे. ही लस देण्याची सुरुवात लवकरच होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार नव्या गाईडलाईन्स बनवत आहे. मात्र सध्या या लसींची संख्या मुबलक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या लसी सर्वात आधी ज्यांना अन्य व्याधी जसे की कॅन्सर, अस्थमा यासारख्या गंभीर समस्या आहेत, त्यांना दिली जाणार आहे. देशात वयस्कर लोकांना ज्यावेळी लस देण्यास सुरुवात झाली, त्यावेळीही हेच निकष लावण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होतो.