Covid Vaccination | सरकारी केंद्रांवर लसीकरणाला पुन्हा गती मिळणार
केंद्राकडून सव्वा लाख लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. हा साठा शुक्रवारी उपलब्ध होणार असल्यामुळे पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय.
कोरोना लसी अभावी दोन दिवसांपासून ठप्प असलेली कोरोना लसीकरण मोहीम आता पुन्हा एकदा सुरु झालीय. कारण केंद्राकडून सव्वा लाख लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. हा साठा शुक्रवारी उपलब्ध होणार असल्यामुळे पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस कशी देता येईल याचं नियोजन केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात जास्तीत जास्त लसीकरण झाल्याशिवाय राहणार नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.