Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्था’वर कोरोनाची एन्ट्री, घरातील कर्मचाऱ्याला लागण

| Updated on: Jan 04, 2022 | 3:38 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी दहा दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी दहा दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे. ‘शिवतीर्थ’ येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी येणे अपेक्षित आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या आहेत.

राज  ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर तातडीनं इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे.  कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल आज किंवा उद्या सकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे.