भ्रष्टाचारासाठी शिवसेनेच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा -सोमय्या
किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील नेते उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यावर भ्रष्टाचार करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे – किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील नेते उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यावर भ्रष्टाचार करतात. त्यानंतर भ्रष्टाचाराला कव्हर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होतो. आणि चौकशी झालीच तर मुख्यमंत्र्यांकडून कालंतराने ही चौकशी बंद केली जाते, असा घणाघात सोमय्या यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Published on: Nov 21, 2021 01:45 PM